Good News | वेंगुर्ल्याची शेफाली खांबकर बनली पहिली ‘गल्फ सुपर शेफ’
दुबईमध्ये भव्यदिव्य कार्यक्रमात झाली घोषणा
दुबई:-वेंगुर्ल्याच्या शेफाली खांबकर ला पहिली ‘गल्फ सुपर शेफ’ होण्याचा बहुमान मिळाला आहे. रविवारी संध्याकाळी दुबई मध्ये झालेल्या एका ग्रँड सोहळ्यात तीन हजार स्पर्धकांमधुन शेफाली खांबकर च्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
बिईंग मुस्कान आणि एस व्ही के यांच्या माध्यमातून दुबई मध्ये पहिल्या गल्फ सुपर शेफ या अत्यंत मानाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्ध मध्ये यु ए इ मधील अनेक नामवंत शेफ नी सहभाग घेतला होता.यू ए इ च्या विविध भागातून तीन हजार हून अधिक शेफ यात सहभागी झाले होते. गेले काही दिवस सेलिब्रिटी शेफच्या उपस्थितीत विविध फेऱ्या मधून पहिल्या सर्वोत्तम बारा शेफची निवड करण्यात आली.सलग तीन दिवस विविध फेऱ्या मधून पाहिल्या टप्यात आठ आणि नंतर अंतिम तीन शेफ ची निवड करण्यात आली.पंचतारांकित पदार्थांपासून स्ट्रीट फूड अशा विविध फेऱ्या जागतिक दर्जाच्या शेफ कडून या स्पर्ध दरम्यान घेण्यात आल्या.
रविवारी 6ऑक्टोबर ला सायंकाळी दुबई मध्ये झालेल्या ग्रँड फिनाले मध्ये शेवटच्या तीन स्पर्धकांमध्ये शेफाली खांबकर निवडली गेली होती.या ग्रँड सोहळ्यात शेफाली खांबकर पहिली गल्फ शेफ बनल्याची घोषणा करण्यात आली.
सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांच्या हस्ते शेफाली हिला गल्फ शेफ ट्रॉफी,प्रमाणपत्र,भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.गल्फ मध्ये झालेल्या या पहिल्या भव्यदिव्य स्पर्ध्येत अव्वल ठरत एका कोकण कन्येने गल्फ मधील या मानाच्या चषकावरआपले नाव कोराल्यामुळे तीचे विशेष अभिनंदन होत आहे .शेफाली वेंगुर्ल्यातील पाटकर हायस्कूल ची विद्यार्थिनी आहे.
गल्फ मधील हि मानाची स्पर्धा जिंकल्या नंतर प्रतिक्रिया देताना शेफाली ने “माझ्यासाठी हि फार मोठी अचिव्हमेंट आहे.स्वप्न सत्यात उतरले आहे असा वाटतंय.अर्थात या सगळ्यात माझे पती चेतन किन्नरकर,सासूबाई यांचा सगळ्यात मोठा सपोर्ट होता.कोकणातील तुलनेने छोट्या पणं सुंदर शहरातून मला सतत पाठबळ देणाऱ्या माझ्या आई वडील ,बहिणीमुळे इथ पर्यंत आले” अशा भावना शेफालीने व्यक्त केल्या.
रविवारी दुबई मध्ये शेफाली च्या नावाची घोषणा झाल्या नंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.शेफाली वेंगुर्ल्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर आणि सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी संध्या खांबकर यांची कन्या आहे.शेफाली च्या या यशा नंतर मुलीच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिलेल्या या दोघांचे हि विशेष अभिनंदन केले जात आहे.