चेन्नई : भारत श्रीलंके दरम्यान अत्यंत कमी तिकीट दरात प्रवास करण्याची संधी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या फेरीबोट सेवेमुळे उपलब्ध होणार आहे. बारा वर्षांपूर्वी हालचाली सुरू झालेल्या या प्रकल्पाला अखेर 10 ऑक्टोबर 2023 चा मुहूर्त मिळाला आहे. या फेरीबोट सेवेमुळे दोन्ही देशांमध्ये अवघ्या तीन तासांमध्ये प्रवास करणे शक्य होणार आहे.
तामिळनाडूतील नागापट्टीणम तसेच श्रीलंकेतील जाफीनामधील कणकेसंथुराई फेरी बोट सेवे संदर्भात दोन्ही देशांमध्ये झालेल्या MoU नुसार ही सेवा दिनांक 10 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत ही फेरीबोट चालवली जाणार आहे.