Konkan Railway : लो. टिळक टर्मिनस-थिवी समर स्पेशलच्या फेऱ्या ६ मेपासून
कोकण रेल्वेकडून समर स्पेशल गाड्यांच्या आणखी फेऱ्या जाहीर
रत्नागिरी : उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी होऊ लागल्याने या मार्गावर आणखी स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या समर स्पेशल गाड्या मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील थिवी स्थानकादरम्यान धावणार आहेत.
या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी (01129) ही समर स्पेशल गाडी आठवड्यातून तीनदा धावणार आहे. या गाडीच्या फेऱ्या दिनांक 6 मे, 8 मे, 10 मे, 13 मे, 15 मे, 17 मे, 20 मे, 22 मे, 24 मे, 27 मे, 29 मे, 31 मे तसेच 3 जून 2023 रोजी होणार आहेत. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता ते गोव्यात थिवीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी (01130) थिवी ते लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर दिनांक 7 मे, 9 मे, 11 मे, 14 मे, 16 मे, 18 मे, 21 मे, 23 मे 25 मे, 28 मे, 30 मे दिनांक 1 जून तसेच 04 जून 2023 रोजी धावणार आहे. थिवी येथून ही गाडी सायंकाळी चार वाजून 40 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी ती लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचेल.
एलटीटी-थिवी समर स्पेशलचे थांबे
कोकण रेल्वे मार्गावर जाहीर करण्यात आलेली ही 18 डब्यांची समर स्पेशल गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ तसेच सावंतवाडी स्थानकावर थांबे घेणार आहे.