https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे ‘मत्स्यालय व्यवस्थापन’ प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

0 80


रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत ‘झाडगाव, रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे ‘मत्स्यालय व्यवस्थापन’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. १६ ते १८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी डॉ. पी.ई. शिनगारे, सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव आणि संशोधन संचालक डॉ. बा.सा. कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून आणि डॉ. बा.सा. कोंकण कृषि विद्यापीठाच्या गीताने पार पडला.

यावेळी डॉ. एन.एच. सावंत, प्राध्यापक व प्रमुख, मत्स्य संपत्ती, अर्थ, सांखिकी व विस्तार विभाग, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव तसेच डॉ. के.जे. चौधरी, प्राध्यापक व प्रमुख, मत्स्य प्रक्रिया विभाग, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, तसेच डॉ. ए.यु. पागारकर, सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक हे उपस्थित होते. यावेळी संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. एस.डी. नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षण समन्वयक श्री. नरेंद्र चोगले, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी केले.


प्रशिक्षनार्थीना मार्गदर्शन करताना डॉ. के.जे. चौधरी यांनी शासकीय योजनांचा लाभ घेवून यशस्वी उद्योजक बनण्याचे आवाहन केले. तर डॉ. एन.एच. सावंत यांनी शोभिवंत मत्स्य पालन व्यवसाय हा स्वयंरोजगार करिता उत्तम पर्याय असल्याचे विषद केले. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. एस.डी. नाईक यांनी प्रशिक्षानार्थिना मत्स्य व्यवसाय करताना सहकारवृत्तीचा अवलंबन करावा, असे आवाहन केले. तसेच त्यांनी आधुनिक विकसित तंत्रज्ञानाची माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमातून घेण्याचे आवाहन केले. संशोधन संचालक डॉ. पी.ई. शिनगारे यांनी मार्गदर्शन करताना प्रशिक्षणार्थिनी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाने विकसित केलेले विविध कृषि विषयक अॅप आणि विद्यापीठ युट्युब चॅनेल वरील विविध माहितीपूर्ण व्हिडीओचा तांत्रिक माहितीकरिता वापर करण्याचे आवाहन केले.


या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून विशेषतः रत्नागिरी, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, व बार्शी, सोलापूर येथून आलेल्या प्रशिक्षणांर्थीनी सहभाग नोंदविला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत तीन दिवसात शोभिवंत मत्स्य पालन व्यवसाय मधील संधी, पालन योग्य शोभिवंत माशांची ओळख, पाणी व्यवस्थापण, मत्स्यालय टाकीची बांधणी, शोभिवंत मत्स्य प्रकल्पाचे शास्त्रीय दृष्ट्या बांधकाम, पिल्ले घालणारे मासे तसेच अंडी लावणारे मासे यांच्या विविध प्रजनन पद्धत, शोभिवंत पाणवनस्पतींची ओळख व अभिवृद्धिच्या पद्धती, आवश्यक विविध उपकरणे व साहित्य यांची ओळख, शोभिवंत माशांचे रोग व त्यावरील उपाय, कृत्रिम व जिवंत खाद्याचे प्रकार, तयार करण्याच्या पद्धती, प्रकाल्प्पाचे अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल तसेच शोभिवंत माशांची काढणी, वाहतूक व विक्री व्यवस्थापण तसेच शासनाच्या विविध अनुदान योजना या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. ए.एन. सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी केले. यावेळी संशोधन केंद्राचे हरीश धमगाये, अभिरक्षक आणि जीवशास्त्रज्ञ श्रीमती. व्ही. आर. सदावर्ते हे देखील उपस्थितीत होते.
हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनाकरिता मा. डॉ. संजय भावे, आदरणीय कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली, डॉ. पराग हळदणकर, विस्तार शिक्षण संचालक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करिता संशोधन केंद्रातील कर्मचारी श्री. मंगेश नांदगावकर, श्री. महेश किल्लेकर, श्रीम. जाई साळवी, श्री. सचिन पावसकर, श्री. दिनेश कुबल, श्री. राजेंद्र कडव, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. प्रवीण गायकवाड, श्री. तेजस जोशी, श्री. स्वप्नील आलीम, श्री. योगेश पिलणकर, श्री. अभिजित मयेकर, श्री. उल्हास पेडणेकर व श्री. दर्शन शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.