मुख्यमंत्री वयोश्री योजनेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी, दि.९ : राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेचे अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत ०४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत होती. आता अर्ज स्विकारण्यास ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पात्र ज्येष्ठ नागरीकांनी अर्ज सादर करावेत, असे सहाय्यक आयुक्त,
समाजकल्याण, रत्नागिरी यांनी कळविले आहे.