https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

Mumbai-Goa Highway I मुंबई-गोवा महामार्गावर नियंत्रण सुटलेल्या खासगी बसने सात वाहनांना ठोकरले

0 63
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथील दर्ग्याजवळील उतारावरील स्पीड ब्रेकरजवळ एका लक्झरी बसने ७ वाहनांना ठोकरले. आज सकाळी ११.४५ वाजता हा अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात झाला आहे. त्यात चौघे  जखमी झाले आहेत. ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हातखंबा येथील दर्ग्यासमोर तीव्र उतार आहे. येथे वाहन चालकांना वेगाचा व वळणाचा अंदाज येत नाही. वेग नियंत्रित न झाल्याने येथे सतत अपघात होत असतात. आज सकाळी ११.४५ वाजता  एमपी ४५ पी १६२६ ही खासगी लक्झरी बस कोल्हापूरहून रत्नागिरीला चालली होती. हातखंबा येथे उतारावर गाडीचे ब्रेक निकामी झाले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तिने दोन कार व  पाच दुचाकिंना धडक दिली. अपघातात चौघे जखमी झाले आहेत.  या अपघातात लक्झरीसह  सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
लक्झरीने पहिली धडक एमएच १०-एएम ९०१० ला दिली. दुसरी धडक इनोव्हा कार एमएच ४६-एपी ४२४३ ला दिली. तिसरी धडक एमएच २४- एएच ७४८ या स्विफ्ट कारला दिली. चौथी धडक एमएच ०९-ईव्ही ५५९६ या दुचाकीला दिली. पाचवी धडक ऍक्टिव्ह एमएच०८- ५५८९ ला दिली. सहावी धडक एमएच ०८-येवाय ४८३७ या मोटरसायकल्ला दिली.सातवी धडक आणखी एक मोटार सायकलला दिली. त्यानंतर बस एक बँकेच्या जुन्या इमारतीवर आदळली व तिथेच थांबली. हा सारा प्रकार थरारक होता. घटना बघणारांच्या अंगावर शहारे आले.
या सर्व अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. १) बस ड्रायव्हर काशिफ खान, वय ४७ रा. मध्य प्रदेश. २) जितेंद्र कुमार चौगुले,  रा. इचलकरंजी हे दोघेजण गंभीर आहेत. ३) सगीर जमील अन्सारी, वय ३३, रा. कोकण नगर, रत्नागिरी
४) महेश घोनपडे, रा. इचलकरंजी हे दोघेजण किरकोळ जखमी आहेत.
सर्वांना नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या व स्थानिक रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या साह्याने ही लक्झरी बस बाजूला घेण्यात आली. महामार्ग पोलीस केंद्र हातखंबाचे  सहायक पोलीस उपनिरीक्षक मुकुंद  महाडिक, सहायक पोलिस उपनिरीक्षक घन:श्याम  जाधव, हेड कॉन्स्टेबल सचिन  भरणकार, पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग लेंडी, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत संसारे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वाहतूक सुरळीत  केली.
Leave A Reply

Your email address will not be published.