रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवतीचा नवरात्रोत्सव उद्यापासून
रत्नागिरी : महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री देवी भगवती मंदिर, रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी येथे दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्रौत्सव गुरुवार दि. 3 ऑक्टोबरपासून साजरा होणार आहे.
गुरुवार, दि. 03/10/2024 रोजी आश्विन शु प्रतिपदा सकाळी 12 वाजता घटस्थापना व देवीची आरती होईल. त्यानंतर पुढील 9 दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, ढोल वादन स्पर्धा आदी कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती श्रीदेवी भगवती पब्लिक ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.