देवरूख (सुरेश सप्रे ) : देवरूखची ग्रामदेवता श्री सोळजाईदेवी माता मंदीरात प्रतिवर्षाप्रमाणे आश्विन शु. १ रविवार दि. १५/ पासून शारदीय नवरात्र (घटस्थापना) सुरु होणार असून ” रविवार दि. २२ रोजी दुपारी १२.०० वाजता सप्ताह विसर्जन सोळजाई मंदिर ते वाडेश्वर मंदिर येथे होईल.
या नवरात्र उत्सवामध्ये दररोज सायंकाळी ७ वाजता महाआरती सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत
यात घटस्थापना, महिला भजन मंडळांची भजने, भोंडला, नाचाची डबल भारी, फुगडी नाच, भजन डबलबारी. शक्ती-तुरा नाच डबलबारी, गायन, श्री सत्यनारायणाची महापूजा. सप्तशती पाठ हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत
खास आकर्षण
शक्तीवाले शाहीर देवेंद्र सनगले, नवलाई नृत्य कला पथक तुरेवाले शाहीर विलास गिजबिले, जय हनुमान नाथ मंडळ परामवाडी.
फुगडी नाच (पर्शरामवाडी) x घोडवली टिपरी नृत्य (डबलबारी)
महिला भजन (योगिता लिंगायत) दांडीया भजनाची डबल बारी पुरस्कृत श्री. निलेश कामेरकर
प्रकाश पारकर (सिंधुदूर्ग) x प्रमोद हयान (मुंबई) विवेक नारकर (पाचल) x संतोष मिराशी (कणकवली-सिंधुदुर्ग) याची भजन डबलबारी
आखाडे सर, शिल्या मुंगळे, समीर महाडिक यांच्या अँकॅडमीचे कार्यक्रम.
राजाराम पंडीत यांचे सुश्राव्य गायन. पुरस्कृत संतोष केदारी.
शक्तीवाले शाहीर संतोष गावडे, चाफवली x तुरेवाले शाहीर टाकळे, सोनगिरी.
शक्तीवाले अविनाश तांबे (मोजे असुर्डे) x तुरेवाले विनायक कुमार (कोलथे-लांजा).
*शक्तीवाले शाहीर प्रदिप धाडवे, खेमनाथ नाथ मंडळ खेड तुरेवाले शाहीर पप्या जोशी, श्रीकृष्ण कलामंच दापोली
श्री सांबा बाघजाई देवी नमन मंडळ, ओझरेखुर्द गुरववाडी प्रायोजक केतकर बंधू ज्वेलर्स (मोतिवाले) सह्याद्रीनगर
साडवली
हनुमान प्रा. बाल मित्रमंडळाची
दिंडी
श्री सोळजाई ग्रामदेवी मंदिर, देवरुख सोळजाई मातेच्या कृपाशीवादाने सर्व देणगीदार व पुरस्कृतांचे विषेश आभार मानण्यात येणार आहेत.
सर्व भाविकांनी या सर्व कार्यक्रम चा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. रविवार दि. १५ ते मंगळवार दि. २२ रोजी दु. १.०० ते २.३० वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.