आरवली-कुंभारखाणी मार्गावरील मोरीला भगदाड ; एसटी वाहतूक विस्कळीत
कुंभारखाणी हायस्कूलला जाणाऱ्या मुलांना चालतच गाठावे लागले घर!
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते कुंभारखणी मार्गावरील मोरीला मोठे भगदाड पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मोरीला भगदाड पडल्यामुळे वाहतुकीला असलेला धोका लक्षात येऊन येडगेवाडीच्या दिशेने होणारी वाहतूक चिपळूण तालुक्यातील असुर्डे मार्गे वळवण्यात आली आहे.
आरवली -कुंभारखाणी ते येडगेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोहरीला भले मोठे भगदाड पडल्याचे लक्षात आल्यानंतर देवरुख आगाराच्या आरवली-कुंभारखाणी येडगेवाडीकडे जाणाऱ्या एसटी बसेस पर्यायी असुडे मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
मोरीला मोठे भगदाड पडल्यामुळे सोमवारी कुंभारखाणी येथून मुरडवला एसटी बसने येणाऱ्या मुलांना या मार्गाने जाणारी बस असुर्डे मार्गे वळवण्यात आल्यामुळे मुरडवपर्यंत चालतच घर गाठावे लागले.
सोमवारी सकाळी म्हशी चारायला घेऊन जाणाऱ्या उमेश शांताराम सुर्वे यांना सर्वात प्रथम मोरीला भगदाड पडल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती कुंभारखाणणीचे पोलीस पाटील राकेश सुर्वे यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या मार्गावरून होणारी वाहतूक रोखली.