https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

विसर्जनस्थळी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या, वाद्यांच्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांना मनाई

0 56


रत्नागिरी, दि. 18 (जिमाका) : मांडवी समुद्रकिनारी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनाव्यतिरिक्त व गणपती विसर्जनासाठी सोबत असणारे वाद्यांचे वाहनांव्यतिरिक्त तसेच भाट्ये बस स्टॉप येथून भाट्ये समुद्र किनाऱ्याकडे जाणारा रस्ता सुध्दा एकेरी असल्याने गणपती विसर्जनासाठी गणपती ठेवलेले वाहनाव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चार चाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना 20 सप्टेंबर रोजी (दीड दिवस), 23 सप्टेंबर रोजी (पाच दिवस) गौरी गणपती विसर्जन, 24 सप्टेंबर रोजी (सहा दिवस), 26 सप्टेंबर रोजी (आठ दिवस), आणि 28 सप्टेंबर रोजी ( दहा दिवस) अनंत चतुदर्शी गणपती विसर्जन या दिवशी प्रवेश बंद करण्याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.


अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(4) चा कायदा 22 वा नुसार प्राप्त अधिकारान्वये 20 सप्टेंबर रोजी (दिड दिवस), 23 सप्टेंबर रोजी (पाच दिवस) गौरी गणपती विसर्जन, 24 सप्टेंबर रोजी (सहा दिवस), 26 सप्टेंबर रोजी (आठ दिवस), आणि 28 सप्टेंबर रोजी ( दहा दिवस) अनंत चतुदर्शी गणपती विसर्जन या दिवशी भुते नाका ते मांडवी समुद्र किनारा या दरम्यान मांडवी समुद्रकिनारी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनाव्यतिरिक्त व गणपती विसर्जनासाठी सोबत असणारे वाद्यांचे वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून भाट्ये बस स्टॉप येथून भाट्ये समुद्र किनाऱ्याकडे जाणारा रस्ता सुध्दा एकेरी असल्याने गणपती विसर्जनासाठी गणपती ठेवलेले वाहनाव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चार चाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(4) नुसार या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.