रॉयल किंग उरण प्रीमियर लीग २०२३ चा विजेते तर उपविजेता चिरायू डॉमीनेटर्स
उरण तालुका लेदर क्रिकेट असोसिएशन आयोजित स्पर्धा
उरण दि १ (विठ्ठल ममताबादे ) : दि. 23 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 या दरम्यान उरण तालुक्यातील जेएनपीटीच्या हिरव्यागार मैदानावर आठ दिवस चाललेल्या टी-20/20 लेदर क्रिकेटची लीग स्पर्धा आज यशस्वी संपन्न झाली.
रविवारी झालेल्या मेगा फायनलमध्ये रॉयल किंग संघाने विजय मिळऊन आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या फायनलमधील सामन्यात म्यान ऑफ दी मॅच किताब नयन बंडा यांना मिळाला. या स्पर्धेचा अनेक पारितोषिके प्रदान करण्यात आली. म्यान ऑफ दी सिरीज आणि मोस्ट फोर प्रशांत कडू, तर बेस्ट बॉलर योगेश सरदेसाई, बेस्ट फिल्डर प्रफुल ठाकूर, मोस्ट सिक्स आणि बेस्ट बॅट्समन प्रथमेश म्हात्रे यांना मिळाली.
या स्पर्धेला सुधीर भाई घरत रायगड जिल्हा अध्यक्ष वाहतूक व राष्ट्रीय उपकोषाध्यक्ष भाजप , धनाजी शेठ ठाकूर उदोगपती, मंगेश भाई चौगले सामजिक कार्यकर्ते, फिल्म ॲक्टर बेनिदिक्ट आणि रेफलेक्ट नुट्रीशन डायरेक्टर सुनील ठाकूर, प्रशोब पनिककर, दीपेनभाई, नंदू पाटील जेएनपीटी क्रिकेट टीम कॅप्टन, किरीट भाई पाटील, मनोज भगत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष, बी एन डाकी, विनोदभाई म्हात्रे उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष, जितू भाई नाईंक,दत्ता हरिश्चंद्र ठाकूर, प्रकाश ठाकूर, सदानंद ठाकूर, तसेच इतर अनेक मान्यवर यांनी भेट दिली.या स्पर्धेचे खेळाडूंचे ऑक्शन आणि ट्रॉफी चे अनावरण तसेच स्पर्धेचे उद्घाटन या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले.
युपीएल अध्यक्ष शरद ठाकूर यांनी बक्षीस समारंभ कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आणि दोन्ही टीम चे अभिनंदन करून सन्मानित केले, तर पुढील 2024 च्या स्पधेसाठी तय्यार असल्याचे सुचोवत करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. या वेळी स्पर्धा पार पडण्यासाठी आर्थिक, तसेच बक्षीस स्वरूपात दिलेल्या देणगी दारांचे, मोफत मैदान उपलब्ध करून देणाऱ्या जेएनपीटी स्पोर्ट क्लबचे, स्पर्धेतील सर्व टीम मालकांचे, कॅप्टन आणि खेळाडू, तालुका क्रिकेट पंच कमिटी, स्कोर राईटर, समालोचक व प्रेक्षक यांचे सर्वांचे आभार व्यक्त केले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उरण लेदर क्रिकेट असोसिएशन चे पदाधिकारी अजित म्हात्रे उपाध्यक्ष , मंदार लवेकर उपाध्यक्ष, अमित पाटील खजिनदार, शरद म्हात्रे सचिव, विकास घरत सह सचिव, संदीप पाटील पपू, दिनेश बंडा, निलेश ठाकूर, अमित ठाकूर, तुषार हतंगले, रोहन पाटील या सर्वांनी मैदानाचा ताबा घेऊन स्पर्धा यशस्वी केली. उरण पंच कमिटी माळी सर व सहकारी, जेएनपीटी पीच मेन्टेनर श्री पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले