देवरूख (सुरेश सप्रे) : तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने व जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सब-जुनियर अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धा दि.16 ते 18 मार्च दरम्यान एस.वी.जे.सी.टी.स्पोर्ट्स अकॅडमी सावर्डे, चिपळूण. या ठिकाणी संपन्न होत असून या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडू सहभागी होणार असून संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब,निवे तायक्वांडो क्लब, पी.एस. बने तायक्वांडो क्लब, चे खेळाडू साहिल जागुष्टे,अधिराज कदम, आयुष वाजे, श्रावणी इप्ते, सान्वी रसाळ, स्वराली शिंदे, दुर्वा जाधव, हे 7 खेळाडू रत्नागिरी जिल्ह्या संघात निवड झाली आहे.
एस. बने इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी अकॅडमीचे अध्यक्ष माजी आम. डॉ. सुभाष बने,जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रोहन बने,व बारक्या शेठ बने यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभेच्छा कार्यक्रम संपन्न झाला.. या वेळी क्लबच्या अध्यक्षा सौ.स्मिता लाड,प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी क्लबच्या उपाध्यक्षा सौ. पूनम चव्हाण, उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, श्रीकांत यादव,पंकज मेस्त्री, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमित पवार आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या वेळी जिल्हा संघाचे प्रशिक्षक म्हणुन निवड झालेले स्वप्निल दांडेकर यांना सुद्धा अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. सुभाष बने यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2023/03/img-20230314-wa00083555053846743449291.jpg)