https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे नवदुर्गांचा सन्मान

0 50
उरण दि २२ (विठ्ठल ममताबादे ) :  श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यतर्फे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून यावर्षी रँकर अकॅडमी कोप्रोली चौक, कोप्रोली उरण येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना साडी, मिठाई, प्रमाणपत्र, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
रविवार दि २२/१०/२०२३ रोजी सकाळी १०:३० वा. शिक्षक प्रतिक मुंबईकर यांच्या रँकर अकॅडमेच्या सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने सीमा घरत (सामाजिक क्षेत्र ), एकता पाटील (वैद्यकीय क्षेत्र), रणिता ठाकूर (पत्रकारिता )संगीता म्हात्रे (शेती क्षेत्र ), महानंदा भगत (आशा वर्कर ), सुचिता पाटील (स्वच्छता कर्मचारी ), वकील वृषाली पाटील (न्यायदान क्षेत्र ), सुरेखा म्हात्रे (शिक्षण क्षेत्र ), प्रियांका पंडित (पोलीस प्रशासन ) या महिलांचा (नवदुर्गांचा) सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर यांनी भूषविले.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे सल्लागार सुधीर मुंबईकर, शिक्षक साधना मुंबईकर, शिक्षक प्रतीक मुंबईकर,सामाजिक कार्यकर्ते कुमार ठाकूर, महिला सामाजिक कार्यकर्ते सीमा घरत ,सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कोळी , सामाजिक कार्यकर्ते माधव म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक रायगड जिल्हयातील प्रसिद्ध निवेदक सुनिल वर्तक यांनी केले.
आभार प्रदर्शन हेमाली म्हात्रे यांनी केले. उपस्थित महिलांनी आपापली मते व्यक्त करून सुंदर, अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे आभार मानत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष हेमंत पवार,निकिता पाटील,प्रणित पाटील,सचिन म्हात्रे,प्रकाश म्हात्रे,साहिल म्हात्रे,शादिक शेख आदी पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
Leave A Reply

Your email address will not be published.