‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा लांजातील एसटी प्रवाशांना फटका
अठरा बसेस नेल्या रत्नागिरीतील कार्यक्रमासाठी ; अनेक गाड्या रद्द
लांजा : राज्य सरकारच्याच्या शासन आपल्या दारी या अभियान अंतर्गत आज रत्नागिरी येथे झालेल्या कार्यकामासाठी लांजा आगाराच्या 18 एसटी बसेस फिरवल्याने आज तालुक्यातील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप करावा लागला. यामुळे खासगी वाहनांनी दामदुप्पट भाडे उकळले. या प्रकारामुळे लांजा एसटी स्थानकात मोठा गोंधळ उडाला होता.
लांजा ते पाली 70 रुपये भाडे आकारले गेले रत्नागिरी त शासन आपल्या दारी या उपक्रमाला लांजा तालुक्यातील सुमारे 702 लाभार्थी लांजा एसटीच्या 18 बसेस मधून आणण्यात आले होते. ऐन हंगामात एसटी च्या अनेक फेऱ्या वर त्याचा थेट परिणाम झाला. लांजा आगारात एकूण 47 एसटी आहेत 18 गाड्या या कार्यक्रमाला वळविण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. एसटी स्थानकात ग्रामीण भागातील मार्गावर फेरी नसल्याने चाकरमानी, उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या नागरिक यांना खासगी रिक्षा वडाप यांचा आधार घ्यावा लागला. लांजात रत्नागिरी मार्गावर येणारे वडाप वाले प्रवाशांकडून 80 ते 90 रुपये भाडे घेत असल्याची ओरड आहे. लांजा येथून पाली त जाणाऱ्या एका प्रवाशी ला 70 रुपये भाडे घेण्यात आले ही माहिती प्रवाशी बंटी सावंत यांनी दिली रद्द एसटी बसेस यामुळे प्रवासी यांनी लांजा आगाराच्या भोंगळ कारभार बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
लांजा तालुका शिवसेना प्रमुख आणि सेना एसटी संघटना अध्यक्ष संदीप दळवी यांनी शासन आपल्या दारी योजना हा उपक्रम राबविण्यात येत आहे ही बाब चांगली आहे मात्र अनेक नागरिकांना एसटी फेऱ्या रद्द करून त्याचे हाल करणे कितपत योग्य आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली