https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कंटेनर अपघातामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तीन तास ठप्प

0 1,101

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान मुंबई ते गोवाच्या दिशेने डिझेल घेऊन जात असताना अवघड वळणाचा अंदाज न आल्यामुळे कंटेनर महामार्गाच्या मधोमध कलंडला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती.
हातखंबा पोलीस व लांजा पोलीस यांच्या अथक प्रयत्ननंतर तीन तासानंतर कंटेनरला बाजूला करण्यात आले.

मुंबईच्या दिशेने व गोवाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या वेरळ घाटामध्ये रांगा लागल्या होत्या. मुंबई गोवा महामार्गावरील वेळ घाटाच्या मध्यभागी कंटेनर कलंडला होता. हातखंबा पोलीस व लांजा पोलिसांच्या मदतीने दोन क्रेनच्या सहायाने कंटेनरला बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली.

सकाळी दहा वाजता कंटेनरला अपघात झाल्यानंतर हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होती. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे लांजा तालुक्यातील वेरळ घाट अवजड वाहनांसाठी ‘डेंजर झोन’ ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.