मद्द्याच्या दुकानांना रात्री १ वाजेपर्यंत मुभा
रत्नागिरी : जिल्ह्यात ‘थर्टीफर्स्ट’ व नववर्ष स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांच्या मोठ्या संख्येमुळे सेलिब्रेशनला गालबोट यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेताना दहा ठिकाणी नाकाबंदीची व्यवस्था केली आहे. यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांचा विशेष ‘वॉच’ राहणार आहे. पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात आल्यामुळे प्रमुख पर्यटन स्थळ च्या ठिकाणची हॉटेल तसेच लॉजेस फुल्ल झाले आहेत. यामुळे नव्याने येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची ठिकाणी शोधण्यासाठी भटकावे लागत आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या याहीवेळी मोठी आहे. याहीवेळी दापोली गुहागरसह रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, आरे वारे तसेच भाट्ये समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झाली आहे.
याबाबत पोलिसांनी विशेष खबरदारी घेताना जिल्हाभरात दहा ठिकाणी नाकाबंदीची व्यवस्था केली आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी ब्रेथ अनालायझरद्वारे वाहनधारकांची तपासणी केली जाणार आहे. यात मद्य पिऊन वाहन चालवल्याचे लक्षात आल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबरला मध्याची दुकाने रात्री उशिरापर्यंत म्हणजे एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मोबाईल देण्यात आली आहे. त्यानंतर मध्यविक्रीची दुकाने सुरू असल्याचे आढळल्यास पोलिसांकडून तंबी देण्यात आली आहे.