रत्नागिरी, दि.१४ : उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, १५ ऑगस्ट २०२३ सकाळी ९.०५ वाजता भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. (स्थळ : पोलीस परेड ग्राऊंड, रत्नागिरी). सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन समिती सर्वसाधारण योजनेअंतर्गत मंजूर निधीतून उभारण्यात आलेल्या आर्थिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाणे रत्नागिरी कार्यालयाचे उद्घाटन तसेच नवीन पोलीस बसच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : पोलीस मुख्यालय, रत्नागिरी) सकाळी १०.४५ वाजता खैर-ए-उम्मत फाऊंडेशन, मिरकरवाडा आयोजित आरोग्य शिबिर व इतर कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : नगर परिषद शाळा नं. 10, मिरकरवाडा, रत्नागिरी) सकाळी ११ वाजता मच्छी लिलावगृहाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : मिरकरवाडा. रत्नागिरी). सकाळी ११.३० वाजता राजीवडा “नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र” उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : राजीवाडा, शिवखोल, रत्नागिरी) दुपारी १२ वाजता रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित राज्यस्तरावरील निमंत्रितांची कॅरम स्पर्धा, रत्नागिरी कॅरम लीग, सिझन ६ येथे सदिच्छा भेट (स्थळ : देसाई बँक्वेट, हॉटेल विवेक मागे, मेन रोड, रत्नागिरी). दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव. दुपारी १.३० वाजता मोटारीने संगमेश्वरकडे प्रयाण. दुपारी २.१५ वाजता शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : नावडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) दुपारी ३.१५ वाजता संगमेश्वर येथून मोटारीने चिपळूणकडे प्रयाण. सायंकाळी ४ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र (वातानुकूलित नाट्यगृह) इमारत नुतनीकरण कामाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : चिपळूण, जि. रत्नागिरी). सायंकाळी ६ वाजता उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय चिपळूण, सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण नगर परिषद व इतर सामाजिक संस्था व व्यक्तीच्या विद्यमाने चिपळूण शहरामध्ये प्लास्टिक बाटल्या व वस्तुंच्या संकलन वॉक्सच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: चिपळूण, जि. रत्नागिरी) सायंकाळी ६.३० वाजता वशिष्ठी नदीपात्राची पाहणी (स्थळ : बाजार पूल, चिपळूण, जि.रत्नागिरी) सायंकाळी ७ वाजता उमेशजी सपकाळ, नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : डी.बी.जे. महाविद्यालय शेजारी, उमेशजी सपकाळ यांचे संपर्क कार्यालय, चिपळूण) रात्री ८ वाजता उमेशजी सपकाळ नगरसेवक यांच्या जाहिर शिवसेना पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : डी.बी.जे. महाविद्यालय शेजारी, उमेशजी सपकाळ यांचे संपर्क कार्यालय, चिपळूण). रात्री सोईनुसार मोटारीने शासकीय विश्रामगृह, चिपळूण, जि.रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्री ११.५० वाजता शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथून मोटारीने चिपळूण रेल्वे स्थानकाकडे प्रयाण.
बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ००.१६ वाजता चिपळूण रेल्वे स्थानक येथे आगमन व कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.