कामगार नेते संतोष पवार यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
उरण दि 19 (विठ्ठल ममताबादे ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार योगेश कदम यांच्या समवेत संतोष पवार मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य, नगरपरिषद नगर पंचायत संघर्ष समिती यांनी विधान भवन मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेतली. आणि राज्यातील सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायती मधील जे प्रश्न राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्व संबंधित उच्च अधिकारी पदाधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक लावण्या संदर्भात लेखी आदेश संबंधित विभागाला दिल्यामुळे राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित मार्ग निघेल, अशी आशा राज्यातील कामगार कर्मचारी यांना आहे.