खेलो इंडिया बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रासाठी 12 जुलैला खेळाडू निवड चाचणी
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयांतर्गत खेलो इंडिया योजनेतून देशातील विविध जिल्ह्यामध्ये १००० खेलो इंडिया केंद्र, पुढील चार वर्षात निर्माण करण्यात येणार असुन पहिल्या टप्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बॅडमिंटन या खेळाचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याकरीता मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
सदर प्रशिक्षण केंद्राकरीता १२ वर्ष खालील वयोगटाकरीता १५ मुले व १५ मुलींची निवड करण्यात येणार असुन प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी स्टेडीयम, मारुती मंदिर रत्नागिरी येथे सकाळ व सायंकाळ सत्रात सुरु राहणार आहे. निवड झाल्यानंतर सदर प्रशिक्षणास नियमित उपस्थित राहणे बंधनकारक राहिल.
बॅडमिंटन खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरीमार्फत १२ वर्षाखालील मुला/ मुलींच्या निवड चाचणीचे आयोजन 12 जुलै 2022 सकाळी १०.३० वा. बॅडमिंटन हॉल,जिल्हा क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी स्टेडीयम , मारुती मंदिर रत्नागिरी येथे करण्यात आलेले आहे. सदर निवड चाचणीमध्ये सहभागी होण्याकरीता १२ वर्षा करीता खेळाडूचा जन्म ०१/०१/२०१० ते ३१/१२/२०१२ यामधील असावा. सहभागी होताना खेळाडूंनी आधार कार्ड, जन्मदाखला सादर करणे बंधनकारक राहिल.
अधिक माहीतीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सचिन मांडवकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक मो/ क्र.8408865870 यांचेशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचंणीमध्ये सहभागी व्हावे असे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.