गोशीन रियू कराटेचे राज्यस्तरावर यश
उरण (विठ्ठल ममताबादे ) : दिनांक 10 ते 12 जून 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पुणे येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या.त्यामध्ये गोशीन रियू कराटेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध वजनी गटामध्ये रोहित शरद घरत सिल्व्हर मेडल, शुभम परशुराम म्हात्रे ब्रॉन्झ मेडल, नेहा विशाल पाटील यांनी ब्रॉन्झ मेडल मिळविले. परेश पावसकर, समीक्षा पाटील, अभिज्ञा पाटील, श्लोक ठाकूर, वेदा ठाकरे आदी स्पर्धक यात सहभागी झाले होते.
या स्पर्धे मध्ये एकूण 1714 खेळाडू सहभागी झाले होते.या विद्यार्थ्यांना सिहान राजु कोळी व गोपाळ म्हात्रे,रायगड जिल्हा प्रमुख मटीवानंद सर,राहुल तावडे रायगड जिल्हा सचिव अतुल पोतदार, अतुल बोरा रायगड जिल्हा उपाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले.
ही स्पर्धा संघटनेचे अध्यक्ष सल्लाऊदिन अन्सारी,सचिव संदीप गाडे,संदीप वाघचौरे, खजिनदार पंच कमिटी प्रमुख अनुप देटे, कैलास लबडे पाटील, हरिदास गोविंद यांनी आयोजित केले होते.उरण तालुक्यातील सुयश प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.