ग्रामस्थांच्या स्थलांतराबाबत एनडीआरएफकडून खबरदारी
चिपळूण : चिपळूण तालुक्यात सह्याद्री डोंगर रांगांच्या पायथ्याशी असणार्या नांदिवसे ग्रामपंचायतीमधील राधानगरवाडीच्या वरील डोंगरास 200 मीटरची भेग पड
यामुळे खबरदारी म्हणून गावकर्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने तेथील गावकर्यांशी चर्चा केली.
गेले काही दिवस कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनडीआरएफची पथके आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आधीच तैनात करण्यात आली आहेत. चिणळूण येथील या पथकाने सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या नांदिवसे गावाच्या वरील डोंगराला भली मोठी भेग गेल्याने तेथे दाखल झाले आहे. याबाबत या पथकाने ग्रामस्थांची स्थलांतराबाबत चर्चा केली आहे.