शिरगाव येथे 15 जुलै रोजी रोजगार मेळावा
रत्नागिरी : राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील खाजगी आस्थापनांना कळविण्यात येते की, जागतीक युवा कौशल्य दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वे कौशल्य विकास केंद्र, शिरगाव आणि जिल्हा
उद्योग केंद्र, रत्नागिरी यांचे संयुक्त विदयमाने जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या
संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हयातील पंडीत दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे १५ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था बाया कर्वे कौशल्य विकास केंद्र, शिरगाव, रत्नागिरी येथे आयोजन करण्यांत आलेला आहे.
या द्वारे रत्नागिरी जिल्हयातील खाजगी आस्थापनांना कळविण्यांत येते की, www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर आपणांकडे उपलब्ध असलेली रिक्त पदे अधिसूचित करण्यांत यावीत. जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी आपणांस देण्यांत आलेला युझर आयडी व पासवर्ड चा वापर
करुन रिक्त पदे ऑनलाईन अधिसूचित करावीत आणि प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याचे माध्यमातून उमेदवारांची
निवड करुन रोजगार उपलब्ध करुन देण्यांत यावा.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणेसाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी या कार्यालयाकडे त्वरीत संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन इनुजा शेख, सहायक आयक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी यांनी कळविले आहे. अधिक माहिती करिता मो.क्र. ९४२२१९१५१७ दुरध्वनी क्रमांक- ०२३५२-२२१४७८/२९९३८५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.