भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे
सोलापूर जिल्हाध्यक्षपदी आ. कल्याणशेट्टी ; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाच्या प्रभारीपदी श्री. रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आ. सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा मंगळवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.
श्री. अनासपुरे अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम पहात आहेत. पक्षात विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. सध्या ते उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री म्हणून काम पहात आहेत. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. आ. कल्याणशेट्टी हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मतदारसंघातून २०१९ मध्ये विधानसभेवर निवडून आले. त्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे अक्कलकोट तालुक्यात भारतीय जनता पार्टीची संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांनी पक्षात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. श्री.अनासपुरे व आ.कल्याणशेट्टी या दोघांनाही प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.