ठोस माहिती दिली जात नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी
रत्नागिरी : देखभालीच्या कारणांमुळे सोमवारी सकाळी बंद केलेला रत्नागिरीच्या एमआयडिसीसह अनेक भागातील वीज पुरवठा रात्री साडेबारा तास उलटून गेल्यानंतरही सुरळीत होऊ शकला नव्हता. या बाबत महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता मेजर फॉल्ट असल्याचे सांगितले जात होते.
सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी वीज पुरवठा देखभालीच्या कामासाठी खंडित करण्यात आला होता. रात्री दहाच्या सुमारास वीज पुरवठा वीज पुरवठा सुरू झाला मात्र तोही योग्य दाबाने होत नव्हता. याबाबत ग्राहकांना स्थानिक महावितरणच्या कार्यालयाकडून योग्य माहिती देत नसल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या.
दरम्यान, सकाळी साडेआठ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सायंकाळी उशिराने काही वेळासाठी सुरू झाला होता मात्र तो योग्य दाबाने होत नव्हता. त्यामुळे ग्राहकांना वीज उपकरणे जळून जाण्याच्या भीतीने बंद ठेवावी लागली होती.
रात्री साडेदहा नंतरही रत्नागिरीच्या एमायडिसी भागातील विजेचा खेळखंडोबा सुरू होता. तो कधी सुरळीत होईल याची कोणतीच ठोस माहिती स्थानिक कार्यालयाकडून दिली जात नव्हती.