सत्तर जणांचा शिबिरात सहभाग
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन, रत्नागिरी तालुका फोटोग्राफर्स व्हीडीओग्राफर्स असोसिएशन आणि निकाॅन इंडिया लिमिटेड, सन आर्ट स्टुडिओ सांगली आणि बालाजी मीडिया इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी शहरातील मांडवी येथील हाॅटेल सी फॅन्स याठिकाणी नवनवीन कॅमेर्यांची माहिती व टेक्निकल गोष्टी याबाबत एक दिवशीय वर्कशाॅप आयोजित करण्यात आले होते. या वर्कशाॅपमध्ये ७० जणांनी सहभाग घेतला.
या वर्कशाॅपला निकाॅन कंपनीचे प्रशिक्षक देव पाटील यांचे मार्गदर्शन व कॅमेरातील बदल, मिररलेस कॅमेरे, लेन्से कश्या व कुठे वापराचा, फोटोग्राफी करताना लाईटचा उपयोग, बॅकग्राऊंड, लिमिटेड जागेत कश्यास्वरुपाचे फोटो, वेडींग फोटोग्राफी, प्री वेडींग फोटोग्राफी, सिनेमॅटीक फोटोग्राफी याविषयी त्यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या कॅमेराबद्दल असलेल्या शंका देखील त्यांनी सोडवल्या. तसेच यावेळी निकाॅन महाराष्ट्र व गोवा सेल्स प्रमुख विवेक सर, बालाजी मीडियाचे प्रमुख श्रीराम जाधव, सन आर्ट स्टुडीओ सांगलीचे शरद सारडा व माॅडेल म्हणून मानसी पटवर्धन उपस्थित होते.
यावेळी देव पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी सर्वांना रत्नागिरी जिल्हा असोसिएशन कडून सत्कार करण्यात आला. रत्नागिरी असोसिएशनचे प्रमुख सचिन सावंत, किरण खेडेकर, कांचन मालगुंडकर, गुरु चौगुले,ज्ञानेश कांबळे व श्वेता बेंद्रे व राजापूर, लांजा, संगमेश्वर तालुका असोसिएशनचे पदाधिकार्यांनी या वर्कशाॅपसाठी मेहनत घेतली व वर्कशाॅप उत्तमरित्या संपन्न झाले.