उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुका कृषि विभाग मार्फत खरीप हंगाम 2022-23 यशस्वी करण्यासाठी व आधूनिक कृषि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्यातील कृषि विभागाचे अधिकारी / कर्मचारी, जिल्हा परीषद कृषि विभाग, विदयापिठे/कृषि विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ, कृषि मित्र हे शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक 25 जून ते 01 जुलै 2022 या कालावधीमध्ये कृषि संजीवनी मोहीम प्रत्येक गावामध्ये राबविणार आहेत.
या कृषि संजीवनी मोहीमेमध्ये विविध विषयांवर आधारीत मार्गदर्शन, पिक प्रात्यक्षिक भेट, चर्चासत्र, परीसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत. दि. 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करुन कृषि संजीवनी मोहीमेचा समारोप करण्यात येणार आहे. कृषि संजीवनी मोहीमेच्या माध्यमातुन कृषि विभागामार्फत विविध योजनाबाबत अदयावत माहीतीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. या कृषि संजीवनी मोहीमे अंतर्गत प्रत्येक गावामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले असून सदरील कार्यक्रमास कृषि विभागाचे अधिकारी, शास्त्रज्ञ यांचे व्दारे मार्गदर्शन करण्यात येणार असून तालुक्यातील शेतक-यांनी कृषि विभागाचे विविध योजनांची माहीती व लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी व्ही. एस. ढवळ यांनी केले आहे.