उरण ( विठ्ठल ममताबादे ): मनसेचे संस्थापक राजसाहेब ठाकरे तसेच आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रूपेश धूमाळ यांचा वाढदिवस उरण तालुक्यातील रानसई आदिवासी वाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्यांना वह्या, पेन पेन्सी पेन्सील दप्तर कंपासपेटी तसेच खेळाचे साहित्य वाटप करून वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. रानसई आदिवासी वाडी ही अतिदुर्गम भागात वसली असून आदिवासींची लोकसंख्या येथे मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते. कोणत्याही सुखसुविधा योग्य प्रमाणात त्यांना मिळत नाही. अशातच अशा आदिवासी बांधवांच्या सुख दुखात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपत त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. विदयार्थ्यांना साहित्य वाटप तसेच ज्यूस व ग्लूकॉनडीचेही वाटप करण्यात झाले. यामुळे विदयार्थ्याच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा रानसई येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शाळेचे शिक्षिका कडू मॅडम तसेच केअर ऑफ नेचरचे संस्थापक राजू मुंबईकर यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रस्तावना तसेच सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुनिल वर्तक यांनी क
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे असे आग्रही भूमिका घेणारे आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रूपेश धूमाळ यांच्या कार्याची तसेच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे राजसाहेब ठाकरे यांच्या कार्याची ओळख सुनिल वर्तक यांनी सर्वांना करून दिली.शेवटी सर्व उपस्थितांचे सुनिल वर्तक यांनी आभार मानले.
यावेळी पनवेल मनसे तालुका सचिव ऍडव्होकेट रुपाली मुरकुटे, पनवेल मनसे शहर उपाध्यक्ष स्वरुपा सुर्वे, फॅशन डिझायनर शीतल पोटे, मनसे चित्रपट सेना रायगड जिल्हाध्यक्ष अक्षय सुतार, आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ,केअर ऑफ नेचरचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर, आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष भारतदादा भोपी, व्यवसाय क्षेत्र अध्यक्ष रोहन पाटील, शिव व्याख्याते विवेक भोपी, संघटक किरण पवार, संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, कामोठे शहर अध्यक्ष वृषभ गोंधळी, उरण तालुका अध्यक्ष सुमित थळी, प्रसिद्धी प्रमुख करण नारंगीकर, चंद्रशेखर भोमकर, क्रीडा क्षेत्र प्रमुख ल. ह. पाटील, उरण शहर अध्यक्ष रविंद्र भोईर, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश पाटील, व्यवसाय क्षेत्र प्रमुख कुणाल नाईक, केअर ऑफ नेचरचे अध्यक्ष स्नेहल पालकर, उरण तालुका सचिव अनिल घरत, समाधान पाटील, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे जिल्हा परिषद शाळा रानसईचे शिक्षक वर्ग, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.