https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

संगमेश्वरमध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे उदघाटन

0 75

संगमेश्वर तालुक्यात मॅरेथॉन भरविणे प्रशंसनीय : पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग

संगमेश्वर दि . १२ ( प्रतिनिधी ): मॅरेथॉन स्पर्धा संगमेश्वर तालुक्यात भरविणे हे काम प्रशंसनीय आहे. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो त्यामुळे अशा स्पर्धा दरवर्षी भरविण्यात याव्यात असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी केले.

संगमेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपविभागीय अधिकारी वाघमोडे, पोलीस निरीक्षक उदय झावरे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये लायन्स क्लब अध्यक्ष सतीश पटेल, दिलीप रहाटे, विवेक शेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये महिला ओपन गटामध्ये साक्षी संजय जड्याळ प्रथम क्रमांक हिने पाच किलोमीटर अंतर १८.१५ मिनिटे, प्रमिला पांडुरंग पाटील द्वितीय क्रमांक 1१८ : ४५ मिनिटे, निकिता अतुल मरले २० : १० मिनिटे, तृतीय क्रमांक , साक्षी सुभाष पवार चौथा क्रमांक २१ : ५१ मिनिटे साक्षी शंकर नवाले २१ : ५४ मिनिटे पाचवा क्रमांक पुरुष लहान गट ५ किमी स्वराज संदीप जोशी प्रथम क्रमांक १५ : ४३ , महादेव गजानन कोलेकर द्वितीय क्रमांक १६ मिनिटे, विकास रामविलास राजभर तृतीय क्रमांक १६ : ०६ आयुष सुनील घाणेकर चौथा क्रमांक १७ : १८ ऋतुराज रवींद्र हुमने पाचवा क्रमांक १७ : २३ मिनिटे लहान गट मुली ३ किमी उमेरा हुमायून सय्यद प्रथम क्रमांक ११ : ३० मिनिटे, अनुजा निलेश पवार द्वितीय क्रमांक ११ : ३२ , कोमल विश्वास रेवाळे तृतीय क्रमांक १२ : ४३ मिनिटे, संजना संतोष हरावडे चौथा क्रमांक १२ : ४५ मिनिटे, करीना विलास आधावडे पाचवा क्रमांक १३ : १९ मिनिटे,

पुरुष मोठा गट दहा किलोमीटर संजय मारुती झाकणे प्रथम क्रमांक ३१ : ०७ मिनिटे, करण वीरेंद्र शर्मा द्वितीय क्रमांक ३१ : २० मिनिटे, ओंकार विष्णू बैकर तृतीय क्रमांक ३१ : ३० मिनिटे, संदीप रामचंद्र पाल ३१ : ५३ मिनिटे चौथा क्रमांक आणि अक्षय परशुराम पडवळ ३२ : २५ पाचवा क्रमांक पटकाविले. ही स्पर्धा संगमेश्वर पोलीस ठाणे आणि लायन्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आली होती . स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक देशमुख , पोलीस नाईक सचिन कामेरकर , भाऊ मोहिते , किशोर जोयशी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली .

Leave A Reply

Your email address will not be published.