https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

आता आला ऑटोमॅटिकली स्वीचेबल चार्जर !

0 63


फिनोलेक्सचे मोबाईल चार्जिंग तंत्रज्ञान;जर्मनीकडून स्वामित्व हक्क मंजूर


रत्नागिरी : फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विभाग प्रमुख डॉ. विनायक भराडी व इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विभागाचे प्राध्यापक संतोष जाधव यांनी मोबाईल चार्जिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. यासाठी त्यांना जमनीने स्वामित्व हक्क (पेटंट) मंजूर केले आहे.
हे पेटंट मोबाईल चार्जर संबंधित आहे. ज्यावेळी मोबाईल फोन संपूर्ण चार्ज होईल, तेव्हा विद्युत पुरवठा आपोआप बंद करेल, त्यामुळे विजेची बचत होईल. यासाठी लागणारे हार्डवेअर डॉ. विनायक भराडी यांनी बनविले आहे. तसेच सॉफ्टवेअर प्रा. संतोष जाधव यांनी बनविले आहे. या संशोधनामध्ये ठाकूर महाविद्यालय, मुंबई येथील डॉ. देवेन शाह आणि डॉ. सुजाता अलेगावी आणि ग्रेट ब्रिटन येथील नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीमधील प्रा. भावेश पंड्या आणि डॉ. ओमप्रकाश यांचाही सहभाग होता. हे पेटंट जर्मनी पेटंट कार्यालयामध्ये ऑटोमॅटिकली स्वीचेबल चार्जर या शीर्षकासह मंजूर आणि नोंदणीकृत झाले आहे.
या यशाबद्दल फिनोलेक्स अ‍ॅकॅडमीच्या अध्यक्षा अरुणा कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.