Ultimate magazine theme for WordPress.

उरणमध्ये १२ ऑगस्टपासून राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा

0 31

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे २२ वी जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा

उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे) : कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन’ या संघटने तर्फे खेळाडू , कलाकार,गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ,कौशल्यांना वाव देण्यासाठी,स्पर्धेतुन उतमोत्तम  गुणीजण खेळाडू तयार करण्याच्या अनुषंगाने  दि 12/8/2022 ते रविवार 14/8/2022 दरम्यान वीर सावरकर मैदान, उरण शहर ता:उरण, जिल्हा-रायगड येथे सोशल व फिजिकल डिस्टन्स ठेवून शासनाचे आदेश पाळत राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे तर दि 14/8/2022 रोजी सकाळी 8 वाजता नवीन शेवा, शिवराय चौक, बिपीसीएल रोड, उरण येथे जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गुणवंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय खेळाडू, कलावंत, कलाकार तयार झाले आहेत. खेळाडू, कलाकार आदि स्पर्धकांसाठी एक उत्तम व्यासपीठ(प्लेटफॉर्म) मिळवून देण्याचे काम द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने केले आहे. दरवर्षी या स्पर्धेस या युवा महोत्सवाला सर्व राजकीय पक्षाचे नेते,सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते,सिने अभिनेते आवर्जून भेट देत असतात. कोणताही भेदभाव न करता राजकीय पक्ष विरहित असे या स्पर्धा असल्याने दरवर्षी या जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेला जनतेचाही उत्तम प्रतिसाद मिळतो. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळून, शासनाचे नियम पाळून जिल्हा स्तरीय मॅरेथॉन व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेला अनेक राजकीय, सामाजिक क्रीडा, कला  अभिनय क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.अश्या या जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडू, स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी केले आहे.
कोट(चौकट):-
स्पर्धेसाठी प्रवेशिका(अर्ज )स्विकारण्याची अंतिम तारीख 31/7/2022 असून स्पर्धकांनी आपले अर्ज व नाव नोंदणी गौरीनंदन अपार्टमेंट, शॉप नंबर 7,चारफाटा उरण जि-रायगड पिन 400702,ऑफिस फोन नंबर-02227224498 येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत करायचे आहे dronagiri.sports@gmail.com या ईमेल द्वारेही प्रवेशिका/अर्ज स्वीकारण्यात येईल.अधिक माहितीसाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे खजिनदार शिवेंद्र म्हात्रे-8291616826,सचिन पाटील -97684 85050,क्रीडा प्रमुख भारत म्हात्रे-9619596456 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.