उरण- पनवेलमधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
उरण दि 23(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा राजकीय पक्ष असून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, स्थानिक भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणारी व महाराष्ट्रातील विविध समस्यांना न्याय देणारी महत्वाचे राजकीय पक्ष आहे. तळागाळातील नागरिकांना, गोरगरिबांना न्याय देण्याच्या दृष्टीने व मनसेच्या कार्याचा, विचारांचा तळागाळात प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टी कोणातून मनसेचे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने उरण व पनवेल मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आले आहेत.
मंगेश जनार्धन वाजेकर,राकेश देवयानी भोईर,दिपक धनाजी पाटील,राजेंद्र गोपीनाथ माळी यांची उरण उपतालुका अध्यक्ष पदी तर कैलास माळी, निर्दोष गोंधळी,सुजित सोनावणे,राकेश भोईर,दिपक पाटील, नरेंद्र मोकल यांची पनवेल उपतालुका अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली.तसेच उरण तालुक्यातील विभाग अध्यक्षपदी संदीप ठाकूर, निशांत ठाकूर,दिपक सुतार, कृष्णा ठाकूर, अनिल गावंड, महेश पाटील,अमर ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सदर नियुक्त्या मनसेचे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसेचे युवा नेते अमितसाहेब ठाकरे यांनी उदघाटन केलेल्या उरणमधील मनसेच्या संपर्क कार्यालयात रायगड जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांनी केल्या.यावेळी रायगड जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील,उपजिल्हाध्यक्ष दीपक कांबळी, प्रवीण दळवी,तालुका अध्यक्ष रामदास पाटील (पनवेल) ,सत्यवान भगत (प्रभारी तालुका अध्यक्ष उरण ) हे उपस्थित होते. मनसेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.काही जणांनी प्रत्यक्ष भेटून तर अनेक नागरिकांनी सोशल मीडिया द्वारेही मनसेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.