Ultimate magazine theme for WordPress.

एलटीटी-ठोकूर गणपती स्पेशलचे आरक्षण आजपासून खुले

0 75


रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गणेशेत्सवासाठी गुरूवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या एलटीटी- ठोकूर गणपती स्पेशल 01153 / 01154 गाडीसाठी आरक्षण दि. ९ जुलैपासून रेल्वेच्या संगकीकृत आरक्षण खिडक्यांसह आरआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होणार असल्याची मााहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर आधी जाहीर केलेल्या गणपती विशेष गाड्यांच्या 32 अतिरिक्त फेऱ्या जाहीर केल्या असतानाच या मार्गावर गणेशोत्सवासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते ठोकूर दरम्यान रोज धावणारी विशेष गाडी गुरूवारी जाहीर करण्यात आली आहे.
याआधी32 अतिरिक्त फेरा जाहीर करण्यात आले आहेत. या पाठोपाठ आता कोकण रेल्वेने 01153/ 01154 या कामांकडे धावणारी आणखी एक विशेष गाडी जाहीर केली आहे.
ही गाडी दिनांक 13 आॅगस्ट ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत दररोज धावेल. ही गाडी मुंबई ते लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री सव्वा दहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजता ती कर्नाटकमधील ठोकुरला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी दिनांक 14 आॅगस्ट ते 12 सप्टेंबर 2022 या कालावधीत ठोकूर येथून संध्याकाळी साडेसात वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
चोवीस डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे,, संगमेश्वर रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वै•ाववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थीवी, करमाळी, मडगाव, कारवार, कुमटा, गोकर्ण रोड, मुर्डेश्वर, •ाटकळ, मूकांबिका रोड, बिंदुर, कुन्दापुरा, मुलकी आणि सुरतकल या स्थानकांवर थांबे घेत कर्नाटकमधील ठोकुरला तिचा प्रवास संपणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.