https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u179591645/domains/digikokan.com/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1164

Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u179591645/domains/digikokan.com/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1165

Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u179591645/domains/digikokan.com/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1166

Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u179591645/domains/digikokan.com/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1177

एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेवर पोहोचण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील

0 113

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील

रत्नागिरी  : जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी त्यांच्या दालनात एसटी महामंडळ संप आणि उद्यापासून सुरु होणाऱ्या 12 वीच्या परिक्षाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्राच्या ठिकाणी वेळेत पोहोचता यावे, त्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या दृष्टीने बैठक घेतली.

 या बैठकीला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. रत्नागिरी, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ हे उपस्थित होते.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक  (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक  (इ. 12 वी) शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षा 04 मार्च  पासून सुरु होत आहेत. परिक्षा कालावधीत एसटी महामंडळाच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांना वेळेवर परीक्षा केंद्रात पोहोचता यावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन पाटील यांनी बैठक घेऊन संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.

जिल्हाधिकाऱी यांनी  सध्या सुरु असलेल्या एसटी फेऱ्या वेळेतच सोडण्याबाबत विभाग नियंत्रक यांचेमार्फत जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुखांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच  ज्या भागात फेऱ्या सुरू  नाहीत, मात्र विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे अशा शाळांनी संबधित तालुक्यातील आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे शिक्षणाधिकारी  यांनी मुख्याध्यापकांना कळवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

     चालक/वाहक यांना रस्त्यावर विद्यार्थ्यांनी गाडी थांबविण्याच्या सूचना केल्यास गाडी थांबवून त्यांना बसमध्ये प्रवेश देण्याबाबतही सांगितले आहे.

     रत्नागिरी विभागातील आगार व्यस्थापकांचे संपर्कसाठीचे भ्रमणक्रमांक पुढीलप्रमाणे आहेत— दापोली- मृदुला जाधव-9922926407, खेड-प्रशांत करवंदे – 9561358127, चिपळूण- रणजित राजेशिर्के – 8287358672, गुहागर-वैभव कांबळे – 9822029294, देवरुख – राजेश पाथरे- 9420155511, रत्नागिरी – रमाकांत शिंदे – 8237812448, लांजा – संदीप पाटील – 9657112554, राजापूर – सागर गाडे – 9822796976, मंडणगड – हनुमंत फडतरे – 9423885492.

     दि. 04 मार्चपासून सुरु होणाऱ्या 12 वीच्या परीक्षेसाठी एकूण 149 केंद्र (परिरक्षक कार्यालय -12)  असून 19 हजार 733 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत. तसेच 15 पासून सुरु होणाऱ्या 10 वी च्या परीक्षेसाठी  एकूण 404 केंद्र असून  21 हजार 79 एवढे विद्यार्थी बसलेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.