सुरत-मडगाव विशेष ट्रेन १७ मार्चला धावणार!
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा ; ६ मार्च पासून आरक्षण
रत्नागिरी : सुरत ते मडगाव अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी आठवड्यातून एकदा चालविण्यात येणारी विशेष गाडी दि. १७ मार्च रोजी धावणार आहे. या गाडीसाठीचे आरक्षण दि. ६ मार्च रोजी खुले होणार आहे.
ही गाडी (09193) सुरतहून दि. १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी १२.३० वाजता ती गोव्यात मडगावला पोहचेल. ही गाडी (09194) मडगावहून दि. १८ रोजी दुपारी १ वा. ४० मिनिटांनी सुटेल आणि सुरतला ती दुसर्या दिवशी १९ मार्चला ८ वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल. ही साप्ताहिक विशेष ट्रेन वलसाड, वापी, पालघर, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबे घेणार आहे.
पंधरा एलएचबी डब्यांच्या या गाडीला टू टायर वातानुकूलित एक, थ्री टायल वातानूलित चार, स्लीपर सहा, सेकंड सीटींगचे दोन तर जनरेटर कार दोन असे 15 कोच जोडले जाणार आहेत. या गाडीचे आरक्षण तिकीट खिडकी तसेच आयआरसीटी संकेतस्थळावर 6 मार्चपासून खुले होईल.