Ultimate magazine theme for WordPress.

कडवई जि. प. गटात अनेक इच्छुकांचे मनसुबे धुळीला मिळाले

0 49

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव झाल्याने या गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्याचे मनसुबे धुळीला मिळाले असल्याचे दिसून येते .कडवई पंचायत समिती गण हा सर्वसाधारण झाला असून आता या गणातून अनेक इच्छुक आपले नशीब आजमावतील त्यामुळे या गणात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नव्याने निर्माण झालेल्या मुरडव पंचायत समिती गणात इतर मागास प्रवर्गातील स्त्री उमेदवारांमध्ये कडवी झुंज पहायला मिळेल असे बोलले जात आहे.


विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांचा जिल्हा परिषद गट हा इतर मागासप्रवर्ग स्त्री राखीव झाल्याने या गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या अनेकांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. या गटाचे आरक्षण सर्वसाधारण पडले असते तर या गटातून निवडणूक लढवण्यास अनेक मातब्बर इच्छुक होते. मात्र, आता या सर्वांचे मनसुबे धुळीला मिळाले असल्याचे बोलले जात आहेत.

या आरक्षणामुळे संतोष थेराडे यांनाही आता दुसरा मतदार संघ शोधावा लागणार आहे . कदाचित कसबा जिल्हापरिषद गट हा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने थेराडे आपला मोर्चा कसबा गटाकडे वळवतील अशी शक्यता वर्तवली जात आहव. मात्र या गोष्टीला स्थानिक कीती प्रतिसाद देतील यावरच थेराडे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल्या या गटातून शिवसेनेच्या वतीने कडवई च्या सरपंच विशाखा कुवळेकर यांचे नाव आघाडीवर आहे.तर राष्ट्रवादी , मनसे व शिवसेनेचा दुसरा गट ही आपले उमेदवार रिंगणात ठेवण्याचा तयारीत आहेत. माजी बांधकाम सभापती राजन कापडी यांच्या पत्नी या भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे .मात्र सध्या भाजपच्या वाटेवर असणारे माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी मिळू शकते .
याच जिल्हापरिषद गटाचे कडवई व मुरडव असे दोन पंचायत समिती गण असून कडवई गण हा सर्वसाधारण झाला असल्याने अनेक जण या गणातून रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे . यामध्ये राष्ट्रवादिकडून कडवईचे उपसरपंच दत्ताराम ओकटे व राष्ट्रवादीचे उपतालुकाअध्यक्ष फैयाझ माखजनकर हे इच्छुक असल्याचे समजते तर शिवसेनेकडून तुरळ चे माजी सरपंच आणि धडाडीचे कार्यकर्ते अरविंद जाधव , शेनवडे सरपंच दत्ताराम लाखन हे इच्छुकांच्या यादीत आहेत.


यापैकी अरविंद जाधव यांना पक्षाकडून संधी दिली जाऊ शकते अशी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.तर शिवसेनेच्या दुसऱ्या गटाचे कडवईचे माजी सरपंच वसंत उजगावकर हे ही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात . तर मनसे ही या गणातून एक सुशिक्षित उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे समजते .भाजप ही आपला उमेदवार देऊ शकते त्यामुळे या गणातून चुरशीची लढत पहायला मिळू शकते .

मुरडव गण हा नव्याने रचना झालेला असल्याने या गणातून उमेदवार कोण असेल हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल . मात्र या गणातून शिवसेनेकडून माजी सभापती मनीषा गुरव , प्रेरणा कांनाल याना संधी दिली जाऊ शकते . शिवसेना व राष्ट्रवादी आघाडी असल्यास हा गण राष्ट्रवादी ला सोडला जाऊ शकतो अशी चर्चा आहे .मनसे ही या गणातून महिला उमेदवार देणार असल्याचे जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले .एकंदरीत या जिल्हा परिषद गटाचे चित्र अजून स्पष्ट होणार नसले तरीही या गटात चुरशीची लढत पहायला मिळेल यात शंका नाही .

Leave A Reply

Your email address will not be published.