https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नाने सुरक्षा रक्षक कामावर रुजू

0 61

उरण दि १७(विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कंटेनर कार्पोरेशन ऑफ इंडिया (DRT JNPT)येथील सुरक्षा रक्षक गेले ११ महिने कामापासून वंचित होते .त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी खूप शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.त्यासाठी रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष कामगार नेते  महेंद्रशेठ घरत यांचे कुशल नेतृत्व कामी आले.

गरिबांचा कैवारी, गरजवंतासाठी झटणारा नेता म्हणून महेंद्र घरत सर्वपरिचित आहेत.सुरक्षा रक्षकांना सिडको सारख्या आस्थापनेत नोकरी मिळवून देण्यासाठी महेंद्र घरत यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे कामगारांना न्याय मिळाला.आज प्रत्येक सुरक्षा रक्षकांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे.त्यांच्या कुटुंबाकडून कामगार नेते महेंद्र घरत यांना आशिर्वाद दिले जात आहेत.कार्याध्यक्ष पी. के रमण, सरचिटणीस वैभव पाटील व संघटक योगेश रसाळ यांनी या कामी महत्वाची मेहनत घेतली आहे. कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नाने सुरक्षा रक्षक कामावर रुजू झाल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.