रत्नागिरी येथील तीन दिवसीय रत्नकृषी महोत्सवाची सांगता
रत्नागिरी : तीन दिवस चाललेला कृषी महोत्सवाला आगामी वर्षी पर्यटन महोत्सवाची जोड द्या व राज्यातील सर्वोत्तम महोत्सव पूर्वनियोजनात करा, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
तीन दिवसीय महोत्सव व पशुपक्षी प्रदर्शनाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुर्हाडे, पशुसंवर्धनचे धनंजय जगदाळे, बाबू म्हाप आदी उपस्थि होते.
पुढील वर्षी 1 मे रोजी याची सुरुवात होईल असे नियोजन करा, असे सामंत यावेळी म्हणाले. कृषी व पर्यटन महोत्सव सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरेल असेही त्यांनी सांगितले.
या महोत्सवात 120 स्टॉलधारक तसेच पशूपक्षी प्रदर्शनात राज्याच्या सर्व भागातील पशूपालक सहभागी झाले होते. यातील विजेत्यांना पुरस्कार व स्मृतीचिन्ह देवून त्यांचा सन्मान अतिथींच्या हस्ते करण्यात आला.