https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

केंद्रीय नौकानय मंत्री सरबानंद सोनोवाल यांच्यासोबत भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाची नवी दिल्लीत बैठक

0 91

देशातील प्रमुख बंदरातील कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा

उरण दि 25 (विठ्ठल ममताबादे ) : देशाचे केंद्रीय नौकानयन मंत्री सरबानंद सोनोवाल यांची भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व वेतन करार समितीचे सदस्य व कामगार नेते सुरेश पाटील यांनी नवी दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवन मध्ये भेट घेऊन देशातील प्रमुख बंदरातील कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा घडवून आणली. यामध्ये वेतन करार लवकरात लवकर करावा व इतर महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन मा.केंदिय नौकानयन मंत्री सरबानंद सोनोवाल यांना दिले.तसेच  वेतन करार समितीमध्ये सर्व महासंघांना समान संधी द्यावी आणि वेतन करारातील जाचक अटी मागे घ्याव्यात अशी मागणी केली.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई पोर्ट येथे भारतीय मजदूर संघास कार्यालय मिळावे अशी मागणी जोरदारपणे माननीय मंत्री महोदयांकडे केली त्यावर मंत्री महोदयांनी ही मागणी लगेच मंजूर करून भारतीय मजदूर संघास मुंबई पोर्ट मध्ये कार्यालय देण्याचे मान्य केले.या चर्चेमध्ये केंद्रीय नौकानय मंत्री सरबानंद सोनोवाल तसेच नौकानयन चीफ सेक्रेटरी राजीव नयन व नौकानयन मंत्रालयातील इतर अधिकारी उपस्थित होते तसेच भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व वेतन करार समितीचे सदस्य कामगार नेते सुरेश पाटील, विशाखापट्टणचे बी. एम. एस.चे कामगार नेते गोपी पटनायक, पॅरादीप पोर्ट बी. एम. एस.चे कामगार नेते श्रीकांत राय व इतर नेते उपस्थित होते.या बैठकीत मंत्री महोदयांनी भारतीय मजूर संघाच्या कामगार नेत्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन कामगारांचे प्रश्न समजून घेतले व या प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.