Ultimate magazine theme for WordPress.

केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांकरिता मोफत कराटे क्लासेस

0 46

उरण दि 27(विठ्ठल ममताबादे ) : अलीकडच्या काळात महिला आणि खास करून तरुणीं सोबत वाढलेल्या छेडछाडीचे प्रकार आणि अश्या वेळी महिला आणि तरुणींना स्वतःचं स्वसंरक्षण करता यावे आणि आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे सामोरं जाता यावं म्हणून महिला,तरुणीं वर्गासोबतच आदिवासी वाडीवस्तीवरील शालेय विद्यार्थी आणि खास करून  विद्यार्थीनी सोबत एखाद्या वेळेस  छेडछाड,चाकूहल्ला, गळाअवळणं,लाठीहल्ला या सारखे प्रसंग उद्भवले तर त्याचा प्रतिकार करता यावे याकरिता मार्शल आर्ट या सारख्या खेळाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. ह्याच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन दूर – दुर्गम, डोंगर- दऱ्यातं राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या भल्या करिता सदैव योगदान देणारे आदिवासी मित्र आणि केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या पुढाकारातून उरण चिरनेर येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट ( कराटे ) या सारख्या खेळाचे प्रशिक्षण घेता यावे म्हणून चिरनेर आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना  मोफत मार्शल आर्ट ( कराटे क्लासेस) शिकविण्याच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.


     केअर ऑफ़ नेचर संस्थेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ह्या मोफत कराटे क्लासेस प्रशिक्षणा करिता मुख्य प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय कराटे कोच गोपाळ म्हात्रे  आणि प्रशिक्षक रोहित घरत यांनी विद्यार्थ्यांना कराटे खेळाचे धडे दिले तर चिरनेर आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना या पुढे सदैव दिल्या जाणाऱ्या मोफत कराटे क्लासेसच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचा राजू मुंबईकर यांनी श्रीफळ ,फुलं – हार वाढवून शुभारंभ केला .आणि सोबतच ह्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय स्तरांवरील आणि इतर स्तरांवरील क्रीडा स्पर्धांमध्ये व मॅरेथॉन सारख्या  स्पर्धांमध्ये भाग घेऊन शाळेचं नाव मोठं करता यावं या करिता धावण्याचे  (रनिंगचे ) प्रशिक्षण देण्याचा शुभारंभ देखील करण्यात आला.

    आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आणि स्वसंरक्षणा करिता राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ह्या आदर्शवत कार्याच्या उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी चिरनेर आदिवासी आश्रम शाळेतील  एकूण  २५५ विद्यार्थी वर्गा सोबतच आंतरराष्ट्रीय कराटे कोच गोपाळ म्हात्रे,कराटे प्रशिक्षक रोहित घरत,शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर, कु.वैष्णवी मुंबईकर, स्नेहा तावडे आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते.या सर्व मंडळींच्या उपस्थितीत ह्या आदर्शवत कार्यक्रमाचा शुभारंभ मोठया उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.