रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणार्या लांब पल्ल्याच्या जामनगर ते तिरुनेलवेली एक्स्प्रेसला (19578/19577) स्लीपर श्रेणीचा एक जादा डबा जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
कोकण रेल्वे मार्गे धावणार्या अनेक गाड्यांना गर्दी होत असल्याने रेल्वे गाड्यांच ही स्थिती लक्षात घेवून अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेते. या आधी देखील या मार्गावरुन धावणार्या काही गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्यात आले आहेत. आता गुजरातमधील जामनगर ते दक्षिणेतील तामिळनाडूमधील तिरुनेलवेलीपर्यंत धावणार्या एक्स्प्रेस गाडीला शयनयान श्रेणीचा एक जादा डबा जामनगर -तिरुनेलवेली फेरीसाठी दि. 9 तसेच 10 सप्टेंबरसाठी तर तिरुनेलवेली ते जामनगर फेरीसाठी दि. 12 व 13 सप्टेंबर 2022 जोडला जाणार आहे. हा बदल तात्पुरत्या स्वरुपाचा असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |