रत्नागिरी : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्या तीन एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या आधी देखील काही विशेष तसेच तसेच काही नियमित गाड्यांना रेल्वेने डबे वाढवले आहेत.
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उधना-मंगळुरु (09057/09058) या सप्ताहिक समर स्पेशल गाडीला उधना येथून दि.5 जूनपासून तर मंगळुरुहून सुटताना दि. 6 जूनपासून स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढण्यात आला आहे. याचबरोबर गांधीधाम-तिरुनेलवेली (20924/20923) गांधीधामहून दि. 6 जूनपासून तर तिरुनेलवेली येथून सुटणार्या फेरीसाठी दि. 8 जूनच्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीचा एक डबा तात्पुरत्या स्वरुपात वाढण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्गे धावणार्या भावनगर -कोचुवेली (19260/19259) या गाडीला भावनगरहून दि. 7 जूनपासून तर कोचुवेलीहून 9 जूनपासून स्लीपरचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील आणखी तीन गाड्यांना जादा डबे
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |