कोकण रेल्वे मार्गावरील आणखी एका गाडीला जादा डबा
✅️ वाढत्या गर्दीमुळे स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढवला
✅️ हापा ते मडगाव या फेरीसाठी ८ जूनपासून अंमलबजावणी
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे आणखी एका गाडीला अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने ज्यादा डबा जोडण्यात आलेली गाडी हापा ते मडगाव दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी आहे.
कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार या गाडीला ( 22908/ 22907 ) स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढवण्यात आला आहे. हापा ते मडगाव या फेरीसाठी या गाडीला दि. ८ जूनपासून तर मडगाव ते हापा या फेरीसाठी या गाडीला दिनांक १० पासून अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.
हापा मडगाव एक्स्प्रेसला हा अतिरिक्त डबा तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना गर्दी वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.