कोकण रेल्वे मार्गावरील आजची जनशताब्दी एक्सप्रेस ‘लेट’ धावणार!
ट्रॅफिक ब्लॉकमुळे होणार वेळापत्रकावर परिणाम
रत्नागिरी : मडगाव ते माजोर्डा यादरम्यान रेल्वे लाईनवरील कामामुळे आज दि. १७ मे २०२२ रोजी अप-डाऊन या दोन्ही जनशताब्दी एक्सप्रेस गाड्या सुमारे चाळीस ते पन्नास मिनिटे उशिराने धावणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वेच्या मडगाव ते माजोर्डा दरम्यान रेल्वे लाईनवर अपग्रेडेशनचे काम सुरू आहे. या कामासाठी कोकण रेल्वेने १७ मे रोजी ट्रॅफिक ब्लॉक घेतला आहे. याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या(12051/12052) या दोन्ही जनशताब्दी एक्सप्रेस गाडयांवर होणार आहे. या कामासाठी जनशताब्दी एक्सप्रेस गाड्यांना सुमारे ४० ते ५० मिनिटे रोखून ठेवले जाणार आहे.
कोकण रेल्वेमार्गावर कु्लेम ते वास्को-द-गामा या मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाडीच्या वेळापत्रकावरही या कामाचा परिणाम होणार आहे. ही गाडी सुमारे एक तास उशिराने लावणार आहे.