रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यापर्यंत धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला दिनांक 15 सप्टेंबरपासून विस्टा डोम कोच जोडण्यात येणार आहे.
सध्या मुंबईतील सीएसएमटी ते गोव्यातील करमाळी दरम्यान धावणारी (22119/22120) तेजस एक्सप्रेस दिनांक १ नोव्हेंबरपासून मडगावपर्यंत धावणार आहे. त्याआधी दिनांक 15 सप्टेंबरपासून या वातानुकूलित आलिशान एक्सप्रेस गाडीला सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसप्रमाणे विस्टा डोम कोच जोडण्यात येणार आहे. यामुळे आता ही गाडी एकूण पंधरा एल एच बी कोचसह धावणार आहे.
मुंबईहून गोव्याला येणारे प्रवासी तसेच पर्यटकांकडून आधीपासून जनशताब्दी एक्सप्रेसला असलेल्या विस्टा डोम कोचला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद लक्षात घेत रेल्वेने याच मार्गावरील तेजस एक्सप्रेस ला देखील पारदर्शक काचानी युक्त असा अत्याधुनिक विस्टा डोम कॉच जोडण्याचा निर्णय घेतला आहे