कोकण रेल्वे मार्गावर धर्मवीर एक्सप्रेस सोडण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक
कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाच्या शिष्टमंडळाने घेतली ना. एकनाथ शिंदे यांची भेट
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात धर्मवीर एक्सप्रेस सोडण्यासंदर्भात कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ठाणे येथील निवासस्थानी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे येत्या गणेशोत्सवात मोदी एक्सप्रेस पाठोपाठ ठाणे येथून कोकण रेल्वे मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी धर्मवीर एक्सप्रेस देखील धावेल, असे संकेत मिळाले आहेत.
कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे यांच्या माध्यमातून कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात
धर्मवीर एक्स्प्रेस सोडण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या ठाणे येथील लुईसवाडी निवासस्थानी शिष्टमंडळाने भेट घेऊन, संघटनेचे प्रमुख राजू कांबळे यांनी संघटनेच्यावतीने उपरोक्त विषयानुरूप मागणीचे निवेदन देऊन सविस्तर माहिती दिली व चर्चा केली. या भेटीत मुख्यमंत्री यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून धर्मवीर एक्स्प्रेस सोडण्याबाबत शिष्टमंडळाला आश्वस्त केले .
या प्रसंगी संघटनेचे प्रमुख राजू कांबळे,
अध्यक्ष सुजित लोंढे, खजिनदार संभाजी ताम्हणकर,
संघटनेचे माजी अध्यक्ष संतोष पवार, सल्लागार श्री सुनील गुरव, रविंद्र बद्रिके, महेश आचरेकर, यशवंत बावदाणे, सभासद प्रमुख: नीलेश चव्हाण,
सभासद दर्शन शेटये, सुवास तोडणकर, अनंत लोके, नामदेव चव्हाण, महेश नारकर, अक्षय शिंदे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.