गणेशोत्सवात २८ ऑगस्ट रोजी दादर येथून स.१० वाजता सावंतवाडीसाठी सुटणार
रत्नागिरी : मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवा दरम्यान श्री मोदी एक्सप्रेस २८ ऑगस्ट २०२२ रोजी सोडण्यात येणार आहे. ही गाडी मुंबईतील दादर स्थानकावरून सावंतवाडीपर्यंत धावणार आहे.


मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांना कोकणात गणेशोत्सवासाठी जाता यावे यासाठी मुंबई भाजपतर्फे श्री मोदी एक्सप्रेस नावाने विशेष गाडी सोडली जाणार आहे. दिनांक 28 ऑगस्ट रोजी ही गाडी दादर स्थानकावरून सकाळी दहा वाजता सावंतवाडीसाठी सुटेल.
गेल्या वर्षी गणेशोत्सवात मोदी एक्सप्रेस नावाने कोकणसाठी गाडी सोडण्यात आली होती. गेल्या वर्षी कोकणचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे ना. राणे यांच्या माध्यमातून दादर येथून मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली होती. यावेळी मुंबई भाजपकडून ही गाडी सोडण्यात येणार आहे. यासाठीचा खर्च देखील मुंबई भाजपकडून उचलला जाणार असल्याची माहिती आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे