रत्नागिरी : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई – मडगाव सुपरफास्ट वनवे स्पेशल ट्रेन धावणार आहे.
मध्य रेल्वेने मुंबई ते मडगाव अशी स्पेशल फेअरवर ही एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
01099 सुपरफास्ट एकेरी विशेष गाडी बुधवारी 8 जून .2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 07.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगावला 17.30 वाजता पोहोचेल.
ही विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या थांब्यावर थांबणार आहे.

एक विस्टाडोम कोच, 3 एसी चेअर कार, 10 द्वितीय श्रेणी चेअर कार, एक द्वितीय श्रेणी आसनव्यवस्था कम गार्डची ब्रेक व्हॅन या प्रमाणे या गाडीला कोच जोडले जाणार आहेत.
आरक्षण: 01099 सुपरफास्ट वन-वे स्पेशल ट्रेनसाठी विशेष शुल्कावर बुकिंग 4.6.2022 रोजी सर्व PRS स्थानांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर उघडेल. वरील ट्रेनचे 4 द्वितीय श्रेणी चेअर कार आणि एक द्वितीय श्रेणी सीटिंग कम गार्डचे ब्रेक व्हॅन कोच अनारक्षित डबे म्हणून धावतील.