कोकण रेल्वे मार्गे धावणारी आजची पटना-वास्को एक्सप्रेस रद्द
विद्यार्थी आंदोलनामुळे ट्रेन रद्द केल्याची रेल्वेची माहिती
रत्नागिरी : पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारीत सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 18 जून रोजीचीची पटना वास्को द गामा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
पूर्व मध्य रेल्वेकडून चालविली जाणारी दिनांक १८ जून रोजीची साप्ताहिक पटना वास्को ट्रेन 12742 हे पूर्णता रद्द करण्यात आली आहे. ही गाडी कोकण रेल्वे मार्गे धावते. पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारीत विद्यार्थी आंदोलन सुरू असल्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. दिनांक अठरा जून रोजी या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची दखल घ्यावी असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.