उन्हाळी हंगामातील वाढती गर्दी रोखण्यासाठी रेल्वेकडून उपाययोजना
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील चार गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी हंगामामुळे गर्दी वाढल्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे
गांधीधाम- तिरूनेलवेली (20924/20923), भावनगर -कोचुवेली (19260/19259), सुरत- करमाळी (09113/09114) तसेच उधना- मंगळुरू (09057/09058) या चार गाड्यांचा यामध्ये समावेश आहे.
डबे वाढवण्याचा हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे कोकण रेल्वेने प्रेस रिलिजमध्ये म्हटले आहे.
प्रतीक्षा यादीवर तिकिटे असलेल्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे