७ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जोडणार अतिरिक्त डबा
रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या साप्ताहिक हिसार जंक्शन ते कोईमतुर एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात एक एसी टू टायर श्रेणीचा अतिरिक्त कोच जोडला जाणार आहे.
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या 22 475 व 22 476 या क्रमांकाने धावणाऱ्या हिसार जंक्शन ते कोईमतुर साप्ताहिक एक्सप्रेसला दिनांक ७ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर 2022 या कालावधीत अतिरिक्त कोच जोडला जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. ही गाडी पूर्वी 20 डब्यांची धावत होती आता एकच वाढवण्यात आल्यामुळे ती 21 डब्यांची होणार आहे